Posts

 या धरणीच्या माथ्यावरती, घट्ट रूजुनी नाती. रंगबेरंगी फुलांची, कोवळी नाजूक पाती. कडेकपारी उगवून भारे, वाट पहाते मृगाची. हातामध्ये हात गुंफूनी, त्याग शिकवते जगण्याची. आनंदाची उधाण भरती, सोसाट्याशी स्तब्ध वाहते. क्षणाक्षणाची पेरण येथे, मुग्ध शब्दाचे झरे राहते. निरोप  येथे समय जाता, हास्य पाखरे फुलविते. मुखमलीच्या पात्यावरती, गोंदण चुडा रेखाटते. @श्री.सोमनाथ पाटील
 तऱ्हेतऱ्हेचे वेचुनी, माळरानी पळस फुले. शृंगाराचे अवडंबरी, साज केशरी चढे.... निळ्या आभाळी, टिळा क्षितिजा, मुक्तांगणे उजळीत, फुलला वारा...... चांदणगारा वेचित, केशर धारा. क्षितिजाला कवेत, वैशाख वैराग्याला..... @श्री.सोमनाथ पाटील
 रम्य दुपारी भिजली काया, तळपत शेला जिर्ण तयाचा. घुमतो उदास पारवा तान्हलेला, जुनाट भिंती पडक्या शाळा. जिर्ण तटाचे अंजन वेली, खेळ रम्य दुपारी सुरपारंब्या. उदास होऊनी पडती ञाह्या, पंख पसरूनि कुशाल रांगा. ..@श्री.सोमनाथ पाटील
 हरलो आज जरी मी, हा माझा श्वास नाही. घेऊन उद्याची मशाली, हे शौर्य उद्या नाही. जिर्ण जरी झाले डोळे, थंड आग नाही. देऊन धडक कातळाला, मानव जातीस भ्रांत नाही. माझ्या आज निशाणीचे, पेरलेत वैर सारे. जळतील जेंव्हा प्रगतीचे, नवे बाहू बीज पेरण्याचे. पेटण्यास उठावे काही, थांबण्यास अर्थ नाही. झटकूनी जरी माना, लाचार स्वाभिमान न ठेवा. परतुनी येईल,कलतूनी जाईल, निर्भर आभाळ शांत. संयम ठेऊनी व्याकूळ, स्थिर पाऊले भविष्यात. ...@श्री.सोमनाथ पाटील.

धुक्यात सारे काव्यसमिधा लेखन

[24/06, 10:24 PM] SP: भरल्या ओंजळीत सुखावेलेलं दाणं हिरव्या चुड्यात उभ रूप देखणं.... सगळं शिवार माखलेलं पाखरां उजाड मातीत सोनं पिकलेलं.... काळ्या विठूचं इमान सार्थ दोन्ही हातात जग विसावेलं.... जन्म जन्माचा पोशिंदा धन दाण्यात लपलं राबला तो बैलं कधी फिटेलं लेणं.... जन्मो-जन्माचा पांग हिरव्या चुड्याची ओंजळ दाणं सुखावेलं काळ.... *काव्यस्पंदनेनिर्मिती श्री.सोमनाथ पाटील* [24/06, 10:24 PM] SP: सुंदर सुंदर वेली वरती रंग--बेरंग फुले किती वेचावे?किती टाकावे? हे ज्याचे त्याने ठरवावे.... माणुसकीच्या विशाल लाटा रक्त न--हवे खरे भगवी,हिरवी,निळी,पांढरी फुले किती जोडावे?किती तोडावे?..... मानवतेची निर्माण करू कैवारे महात्माच्या आत्म्यातच अत्ताराचे फवारे पाठीलागता का?जात-धर्म-भाषा ऐक्य सारे कित्येकांच्या उप-देशात फुले-आंबेडकर-शाहूस छञपतींचे वारे रक्तामधला लाल,हिरवा,निळा भेद पुसून टाका मानवतेचा टिळा प्रेमबंधुता-समता-स्वातंञ्यास कवेत घेऊ महात्म्यांची भरली परडी चौहू आसमांतात फरवू...... *काव्यस्पंदनेनिर्मिती श्री.सोमनाथ पाटील* [24/06, 10:24 PM] SP: पोर्णिमेच्या रात...
Image

राज्यसेवा परीक्षा यशस्वी मार्ग MPSC

राज्यसेवा पूर्व-2018 : 100 दिवसांत यशस्वी तयारीचा राजमार्ग .... मित्रांनो, ब-याच दिवसांपासून  आपण  सर्वजण ज्याची प्रतिक्षा करीत होतो; ती राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात अखेर प्रकाशित झाली आहे. त्यामुळे आता स्वतःला संपूर्णपणे अभ्यासात झोकून देणे अनिवार्य आहे. आजपासून सुमारे १०० दिवस तयारीसाठी मिळतात. हा वेळ जास्तही नाही आणि अपूराही नाही. त्यामुळे  प्रथम वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा  If You Fail to Plan, You Plan to Fail हे तर तुम्ही जाणताच! त्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्वच्या दोन्ही पेपरची यशस्वी तयारी  कशी करावयाची आणि ती ही १०० दिवसांत....ते आपण पाहू ! पेपर -१ या पेपर मध्ये आपणांस एकूण ७ टॉपिक अभ्यासावयाचे आहेत. 1. राज्य, राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय स्तरावरील चालू घडामोडी –   सर्वांत प्रथम हा टॉपिक देण्यामागचा उद्देश हा की इतर घटकांचा जसे- विज्ञान, राज्यघटना, प्रशासन, पंचायतराज, अर्थव्यवस्था अभ्‍यास करताना त्या- त्या क्षेत्रातील चालू घडामोंडींचा संदर्भ घ्यावा. यासाठी प्रथम लोकसत्ता हे दैनिक अनिवार्यरित्या आणि दुसरे आपणास आवडणारे राज्यस्त...