Posts

प्रकाशाचा शोध ॥ ​मी स्वप्नाची क्षितिजे पाहिली, नव्या उमेदीची आस धरून, मर्म उलगडून रात्र काजव्यांची, निघाले काळोख हासडून. ​नव्हता सोबतीला चंद्र चांदणा, नाही दिव्यांची ही रोषणाई, स्वयंम प्रकाशाच्या त्या इवल्या ज्योती, दावित होत्या मजला नवी दिशा ही. ​जगाच्या या अथांग पसाऱ्यात, स्वतःचे अस्तित्व शोधायचे होते, झळाळणाऱ्या त्या क्षितिजापाशी, मज आभाळ कवेत घ्यायचे होते. ​जरी मार्ग हा काट्याकुट्यांचा, अन् सोसावा लागे वादळी वारा, तरी काजव्यांच्या त्या थव्यांमधे, उमजला मला जगण्याचा धारा. ​आता भीती नाही त्या घनघोर रात्रीची, ना चिंता वाटे भविष्याची, क्रांतीच्या या थोर विचारांत, मिळाली मला गुरुकिल्ली प्रकाशाची.

महाराष्ट्र अभयारण्य नावे

 🌏  *TETमहाराष्ट्र भूगोल नोट्स* 🌍 *🤳 महाराष्ट्रातील अभयारण्य 🤳* 1)टिपेश्वर=यवतमाळ 2)कर्नाळा=रायगड 3)रेहकुरी=अहमदनगर 4)राधानगरी- दाजीपूर=कोल्हापूर 5)बोर=वर्धा 6)नरनाळा =अकोला 7)अनेर=धुळे 8)ताडोबा=चंद्रपूर 9)नागझिरा=भंडारा 10)सागरेश्वर=सांगली 11)पेंच=नागपूर 12)नवेगाव=गोंदिया 13)गुगामाळ=अमरावती 14)आंबाबरवा=बुलढाणा 15)येडशी रामलिंग घाट=धाराशिव  16)फणसाड= रायगड  17)ढाकणा कोलकाझ= अमरावती 18)नांदूर-मधमेश्वर= निफाड  19)किनवट=यवतमाळ &नांदेड 20)मेळघाट= अमरावती  21)मयुरेश्वर-सुपे= पुणे  22)चपराळा = गडचिरोली

वसाहत काळातील घटना -साल

 .       ✅ *TETइतिहास शॉर्ट  नोट्स...श्री.एस.पाटील सर-९०४९६३६२३६*  ✅ १)  १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट २)  १८२२ - कुळ कायदा  ३)  १८२९ - सतीबंदी कायदा  ४)  १८३५ - वृत्तपत्र कायदा  ५)  १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता  ६)  १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा  ७)  १८५८ - राणीचा जाहीरनामा  ८)  १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट ९)  १८६० - इंडियन पिनल कोड  १०)  १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट ११)  १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा  १२)  १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट १३)  १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा  १४)  १८८३ - इलबर्ट बिल कायदा  १५)  १८८७ - कुळ कायदा  १६)  १८९२ - कौन्सिल अॅक्ट १७)  १८९९ - भारतीय चलन कायदा  १८)  १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा  १९)  १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा  २०)  १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा  २१)  १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा  २२)  १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा  २...
 या धरणीच्या माथ्यावरती, घट्ट रूजुनी नाती. रंगबेरंगी फुलांची, कोवळी नाजूक पाती. कडेकपारी उगवून भारे, वाट पहाते मृगाची. हातामध्ये हात गुंफूनी, त्याग शिकवते जगण्याची. आनंदाची उधाण भरती, सोसाट्याशी स्तब्ध वाहते. क्षणाक्षणाची पेरण येथे, मुग्ध शब्दाचे झरे राहते. निरोप  येथे समय जाता, हास्य पाखरे फुलविते. मुखमलीच्या पात्यावरती, गोंदण चुडा रेखाटते. @श्री.सोमनाथ पाटील
 तऱ्हेतऱ्हेचे वेचुनी, माळरानी पळस फुले. शृंगाराचे अवडंबरी, साज केशरी चढे.... निळ्या आभाळी, टिळा क्षितिजा, मुक्तांगणे उजळीत, फुलला वारा...... चांदणगारा वेचित, केशर धारा. क्षितिजाला कवेत, वैशाख वैराग्याला..... @श्री.सोमनाथ पाटील
 रम्य दुपारी भिजली काया, तळपत शेला जिर्ण तयाचा. घुमतो उदास पारवा तान्हलेला, जुनाट भिंती पडक्या शाळा. जिर्ण तटाचे अंजन वेली, खेळ रम्य दुपारी सुरपारंब्या. उदास होऊनी पडती ञाह्या, पंख पसरूनि कुशाल रांगा. ..@श्री.सोमनाथ पाटील