राज्यसेवा परीक्षा यशस्वी मार्ग MPSC
राज्यसेवा पूर्व-2018 : 100 दिवसांत यशस्वी तयारीचा राजमार्ग ....
मित्रांनो, ब-याच दिवसांपासून आपण सर्वजण ज्याची प्रतिक्षा करीत होतो; ती राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात अखेर प्रकाशित झाली आहे. त्यामुळे आता स्वतःला संपूर्णपणे अभ्यासात झोकून देणे अनिवार्य आहे. आजपासून सुमारे १०० दिवस तयारीसाठी मिळतात. हा वेळ जास्तही नाही आणि अपूराही नाही. त्यामुळे प्रथम वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा If You Fail to Plan, You Plan to Fail हे तर तुम्ही जाणताच!
त्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्वच्या दोन्ही पेपरची यशस्वी तयारी कशी करावयाची आणि ती ही १०० दिवसांत....ते आपण पाहू !
पेपर -१
या पेपर मध्ये आपणांस एकूण ७ टॉपिक अभ्यासावयाचे आहेत.
1. राज्य, राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय स्तरावरील चालू घडामोडी –
सर्वांत प्रथम हा टॉपिक देण्यामागचा उद्देश हा की इतर घटकांचा जसे- विज्ञान, राज्यघटना, प्रशासन, पंचायतराज, अर्थव्यवस्था अभ्यास करताना त्या- त्या क्षेत्रातील चालू घडामोंडींचा संदर्भ घ्यावा.
यासाठी प्रथम लोकसत्ता हे दैनिक अनिवार्यरित्या आणि दुसरे आपणास आवडणारे राज्यस्तरीय कोणतेही दैनिक अशा दोन वर्तमानपत्रांचे वाचन आणि मनन करावे. याला पर्याय शोधू नये. यासाठीची वेळ सकाळचीच असावी असे बंधन ठेवू नका. आपल्याला कम्फर्टेबल असेल अशी कोणतीही वेळ निवडा.
प्रतियोगिता दर्पण (हिंदी/ इंगजी कोणतेही), क्रॉनिकल असे एक मासिक संग्रही राहू द्या व ते अधेमधे चाळत रहा. काही महत्वाचे वाटले तर त्यावरच हायलाइट करा; तसेच त्याच्या मुखपृष्ठावर त्याची नोंद करा. नोटस् काढण्यात फार वेळ वाया घालू नका. लोकराज्यचे वाचन करत रहा.
चालू घडामोडीचे काही दर्जेदार संदर्भ वापरा यामध्ये विनायक घायाळ(समग्र, स्मॉलेस्ट)/ सांगोलकर/ देवा जाधवर/असे मोजके संदर्भ वापरा कारण बाजारात या पुस्तंकाचे अमाप पीक आले आहे. वरील दोन-तीन संदर्भ वापरल्यास ७०-८० टक्के घडामोडींचा अभ्यास होईल यात शंका नाही.
2. इतिहास –
यामध्ये भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात) आणि भारतीय स्वातंत्र्याची चळवळ यांचा समावेश आहे.
या घटकाचा अभ्यास अतिशय काळजीपूर्वक करा. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास यात आपणांस प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन आणि स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास अभ्यासावा लागतो.
यासाठी अनेक उत्तम संदर्भ आहेत- शालेय पाठ्यपुस्तके आणि NCERT ची पुस्तके प्रामुख्याने वापरावीत. याशिवाय महत्वाचे संदर्भ-
1.आर. एस. शर्मा यांचे NCERT एन्शंट इंडिया याचा के; सागर अनुवाद (वासंती फडके)
2. आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारक (के सागर)
3. मध्ययुगीन भारत –सतीश चंद्र (मराठीत के सागरने अनुवाद केला आहे)
4. मॉर्डन इंडिया – बिपीन चंद्र (मराठीत के सागरने अनुवाद केला आहे.)
5. महाराष्ट्राचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास (वस्तूनिष्ठ) – व्ही बी पाटील
6. इतिहास -रंजन कोळंबे
7. प्राचीन भारत – मोरवंचीकर
8. के सागर संपूर्ण तयारी.
3. महाराष्ट्र,भारत आणि जग यांचा भूगोल –
अतिशय रोचक आणि भरपूर मार्कस् देणारा घटक- यामध्ये प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोलाचा समावेश आहे.
अभ्यास करताना नोटस् काढव्यात.
नकाशे समोर असावेत.
तुलनात्मक अभ्यास लक्षात ठेवण्यास सोपा जातो याचा वापर करावा. जसे- खनिजे अभ्यासताना महाराष्ट्र आणि भारत यांची तुलना ; तर कोळसा साठे बघताना वेगवेगळया राज्यांची तुलना; आंतराराष्ट्रीय पातळीवर अन्य देशांची भारताशी तर विविध खंडातील देशांची एकमेकाशी अशा प्रकारे.
महत्वाचे संदर्भ-
1. शालेय पाठ्यपुस्तके आणि NCERT ची पुस्तके
2. जगाचा भूगोल- माजिद हूसेन यांचे विश्व भूगोल; तसेच के. सिद्धार्थ - मराठीत आहे आणि के सागर संपूर्ण तयारी.
3. भारताचा भूगोल – के. सिद्धार्थ मराठीत आहे , डॉ. अनिरूद्ध, के सागर संपूर्ण तयारी.
4. महाराष्ट्राचा भूगोल – प्रा. खतीब, सवदी, जिल्हे- के सागर
5. प्राकृतिक भूगोल- दाते ; भागवत आणि कार्लेकर
4. राज्यघटना व प्रशासन –
भरपूर मार्क देणारा घटक परंतू या विषयाचा अभ्यास करताना त्याच्याशी संबंधीत ताज्या घडामोडी जसे- नव्या घटनादुरूस्त्या, नवे न्यायालयीन निर्णय, राजकीय घटना, संसदीस घडामोडी, मंत्रीमंडळ, पंचायतराज आणि नागरी प्रशासन यांसंबधी सतत घेतले जाणारे नवे सरकारी निर्णय, नवी वेतने आणि पदनिर्मिती यांचा आढावा; राज्यांशी संबंधीत घटना; लोककल्याणाच्या नव-नव्या योजना आदी बाबी.
पाठांतरापेक्षा शक्य असेल तेथे तुलनात्मक तयारी करा जसे- पंतप्रधान / मुख्यमंत्री; राज्यपाल/ राष्ट्रपती ; देश/ राज्ये अशाप्रकारे.
या विषयासाठी अगदी समर्पक पुस्तके अशी आहेत-
1. सर्वप्रथम लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलीटी हे पुस्तक काळजीपूर्वक अभ्यासा. नोंदी करा. (मराठीत के सागरने अनुवाद केला आहे) हा ग्रंथ परीक्षेसाठी घटनेची गीता आहे
2. अलिकडेच पहिली आवृत्ती प्रकाशित झालेले विनायक घायाळ यांचे ‘स्पर्धा परींक्षांसाठी भारतीय राज्यघटना ’ हे पुस्तक ; या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे
यामध्ये आपली राज्यघटना अगदी १०१ व्या घटनादुरूस्तीपर्यंत बिनचूक अद्ययावत करण्यात आली आहे.
नव्याने परीक्षा देणा-यांनी तर अगदी या पुस्तकापासूनच परीक्षेचा अभ्यास सुरू करावा त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल इतक्या सोप्या पद्धतीने यात घटनेसारखा काहीसा दुर्बोध विषय तितक्याच सोप्या भाषेत समजून सांगितला आहे. तसेच न्यायालयाचे ताजे आणि महत्वाचे निर्णय विस्तृत दिले आहेत.
महाराष्ट्रासंबंधी विस्तृत माहिती- जसे – पंचायराज / नागरी प्रशासन नवे निर्णय; पदस्थ; ही माहीती आपणांस वरील पुस्तकात मिळू शकत नाही.
संपूर्ण पुस्तकाची रचना करताना लेखकाने स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी समोर ठेवला आहे. त्यामुळे अनावश्यक माहीती अजिबात दिली नाही. संपूर्ण पुस्तकच मुद्देसूद स्वरूपात असल्यामुळे वेगळ्या नोटस् काढावयाची मेहनत वाचते तो वेळ इतर अभ्यासासाठी वापरता येतो.
मुद्दे आणि तक्ते यांचा समावेशामुळे कमी वेळात राज्यघटना आत्मसात करता येते.
3. या शिवाय अन्य पुस्तके – रंजन कोळंबे, तुकाराम जाधव यांची पुस्तके आहेत.
5. आर्थिक व सामाजिक विकास –
काहीसा आव्हानात्मक असा हा घटक आहे. याची तयारी करताना आकडेवारी बिनचूक असणे गरजेचे आहे. तेव्हा संदर्भग्रंथाची निवड काळजी घेऊन करा.
या घटकांत आपणांस अतिशय व्यापक स्वरूपाचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये अनेक शासकीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अहवाल; विविध निदेशांक; विकासाच्या आधुनिक संकल्पना; समावेशन ; नवनव्या आर्थिक व सामाजिक योजना आणि जुन्या योजनांचा आढावा ; केंद्राची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आणि अंदाजपत्रक यांचा अभ्यास अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र बाजारू पुस्तकांपासून दूरच राहीलेल बरे हे लक्षात घ्या.
महत्वाची अनिवार्य पुस्तके –
1. भारताची अर्थव्यवस्था - के सागर
2. संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था - विनायक घायाळ
3. भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे
4. 21 प्रश्नपत्रिका – विनायक घायाळ
5. संपूर्ण अंदाजपत्रक सोप्या भाषेत चालू घडामोडी -विनायक घायाळ या पुस्तकात अतिशय सुंदररित्या देण्यात येते; ते अभ्यासा.
7. केंद्राची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी – यासाठी ओरिजीनल अहवाल वाचणे अतिशय वेळखाऊ आणि जिकरीचे ठरेल.परंतु, मराठीत आता ही उणीव दूर झाली आहे.
विनायक घायाळ यांचे ‘भारताची व महाराष्ट्राची आथिक पाहणी’ हे पुस्तक अहवाल प्रकाशित झाल्या नंतर लगेच येते. तेव्हा ते घेणे. याच्या प्रती मर्यादित असतात हे लक्षात असू द्या. ‘आर्थिक पाहणी’ सोप्या पद्धतीने कशी देता येते याचे उदाहरण म्हणजे हे पुस्तक आहे. यामध्ये केंद्राची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवालातील महत्वाचे सर्व काही अतिशय मोजक्या शब्दात व परीक्षेचा विचार करून दिले आहे.
6. पर्यावरण -
हा देखील चालू घडामोडींशी संबंधीत विषय आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
पुस्तके-
1. समग्र परिस्थिकी आणि जैवविविधता- प्रमोद जोगळेकर
2. environment and ecology – KBC NANO
3. पर्यावरण – अमृता पाटील
4. संपूर्ण परिस्थिकी आणि जैवविविधता व हवामान बदल – साधना व योगेश नेतनकर
6. सामान्य विज्ञान -
पारंपरिक सामान्य विज्ञानाबरोबरच यामध्ये देखील चालू घडामोडींशी संबंधीत अभ्यास करावा लागतो
देशाचा आणि परराष्ट्रांचा अंतराळ कार्यक्रम त्याचे टप्पे आणि परिणाम व उपयोग ; अणू तंत्रज्ञान आणि संबंधीत नव्या घटना, करार, प्रकल्प आदी.यासाठी वर सांगितल्याप्रमाणे पेपर वाचन आणि चालू घडामोडींची पुस्तके उपयोगी ठरतात. याशिवाय-

2. विज्ञानावरील –कविता भालेराव आणि नवनाथ जाधव तसेच गोरे यांची पुस्तके
मित्रांनो, अतिशय सविस्तरपणे आपण अभ्यासाचे नियोजन, संदर्भ पुस्तके यांचा विचार केला. याशिवाय काही टिप्स-
के सागरचे पेपर पहिला- संपूर्ण तयारी हे वरील सर्व विषयांचा परामर्श एकत्रितरित्या घेणारे पुस्तक देखील विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रिय आहे.
एक छोटेखानी परंतू मूर्ती लहान पण किर्ती महान असे अतिशय प्रसिद्ध असणारे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे पुस्तक अभ्यासू विद्यार्थ्यांकडेच असतेच असते! कारण प्रत्येक पान, प्रत्येक ओळ आणि प्रत्येक शब्द महत्वाचा असणा-या या पुस्तकाची नुकतीच 35 वी आवृत्ती आली आहे. ती पहा.....बाकी येथे सांगत नाही पण परीक्षा कोणतीही असो त्यात स्मॉलेस्टमधले 5-50 प्रश्न असणार हे नक्की.....
अशा प्रकारे पेपर १ चा अभ्यास करा आणि यश मिळवा आणि त्याकरीता खूप-खूप शुभेच्छा....
पेपर -2
या पेपर साठी अखंडित सराव हाच यशाचा एकमेव राजमार्ग आहे.
1. या पेपरच्या तयारीसाठी विनायक घायाळ यांचे CSAT पेपर दुसरा-समग्र मार्गदर्शक हे पुस्तक एकत्रित तयारीसाठी अतिशय चांगले आहे. यामध्ये काठिण्यपातळी आयोगाशी मिळती-जुळती ठेवण्यात आली आहे. आकलनाचा भाग यामध्ये अतिशय छान पद्धतीने समजून दिला असून उता-याचे वाचन कसे करावे आणि प्रश्न कशा पद्धतीने सोडवावेत हे फ्लो-चार्टसह दाखविले आहे. इतर सर्व घटकही विस्तृतपणे मांडले आहेत. त्यामुळे तयारीसाठी हे पुस्तक अनिवार्य आहे.
2. CSAT पेपर दुसरा- शशिकांत अन्नदाते यांचे पुस्तक हे देखील एकत्रित तयारीसाठी उपयोगी आहे.
3. याशिवाय के सागर यांचे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण असणारे पुस्तक
4. 101 उता-यांसाठी नेतनकर यांचे पुस्तक
5. सी सॅट-थोरबोले, दिशा- CSAT PAPER-2
दुस-या पेपरसाठी -
सराव.... सराव................. आणि फक्त सराव हाच यशाचा एकमेव मार्ग आहे.
अशाप्रकारे ठरावीक पुस्तके आणि वेळेचे काटेकोर नियोजन तुम्हाला १०० दिवसांत यश मिळवून देऊ शकते हे नक्की!!!
|| केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे ||

Comments
Post a Comment