प्रकाशाचा शोध ॥ ​मी स्वप्नाची क्षितिजे पाहिली, नव्या उमेदीची आस धरून, मर्म उलगडून रात्र काजव्यांची, निघाले काळोख हासडून. ​नव्हता सोबतीला चंद्र चांदणा, नाही दिव्यांची ही रोषणाई, स्वयंम प्रकाशाच्या त्या इवल्या ज्योती, दावित होत्या मजला नवी दिशा ही. ​जगाच्या या अथांग पसाऱ्यात, स्वतःचे अस्तित्व शोधायचे होते, झळाळणाऱ्या त्या क्षितिजापाशी, मज आभाळ कवेत घ्यायचे होते. ​जरी मार्ग हा काट्याकुट्यांचा, अन् सोसावा लागे वादळी वारा, तरी काजव्यांच्या त्या थव्यांमधे, उमजला मला जगण्याचा धारा. ​आता भीती नाही त्या घनघोर रात्रीची, ना चिंता वाटे भविष्याची, क्रांतीच्या या थोर विचारांत, मिळाली मला गुरुकिल्ली प्रकाशाची.

Comments

Popular posts from this blog

गोञ व कुळ यादी

भारतीय समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक संस्था,कार्य,कायदे

गणितातील एकके