राज्यसेवा परीक्षा यशस्वी मार्ग MPSC
राज्यसेवा पूर्व-2018 : 100 दिवसांत यशस्वी तयारीचा राजमार्ग .... मित्रांनो, ब-याच दिवसांपासून आपण सर्वजण ज्याची प्रतिक्षा करीत होतो; ती राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात अखेर प्रकाशित झाली आहे. त्यामुळे आता स्वतःला संपूर्णपणे अभ्यासात झोकून देणे अनिवार्य आहे. आजपासून सुमारे १०० दिवस तयारीसाठी मिळतात. हा वेळ जास्तही नाही आणि अपूराही नाही. त्यामुळे प्रथम वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा If You Fail to Plan, You Plan to Fail हे तर तुम्ही जाणताच! त्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्वच्या दोन्ही पेपरची यशस्वी तयारी कशी करावयाची आणि ती ही १०० दिवसांत....ते आपण पाहू ! पेपर -१ या पेपर मध्ये आपणांस एकूण ७ टॉपिक अभ्यासावयाचे आहेत. 1. राज्य, राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय स्तरावरील चालू घडामोडी – सर्वांत प्रथम हा टॉपिक देण्यामागचा उद्देश हा की इतर घटकांचा जसे- विज्ञान, राज्यघटना, प्रशासन, पंचायतराज, अर्थव्यवस्था अभ्यास करताना त्या- त्या क्षेत्रातील चालू घडामोंडींचा संदर्भ घ्यावा. यासाठी प्रथम लोकसत्ता हे दैनिक अनिवार्यरित्या आणि दुसरे आपणास आवडणारे राज्यस्त...