महिला आत्याचार कायदे व कलमे

स्त्रियांवरील हिंसेसंबंधी कायदे आणि भारतीय दंड विधानातील कलमे
अपराधाचे स्वरुप, कलम आणि शिक्षा
•  बलात्कारासारख्या अपराधातील पीडित महिलेचे नाव किंवा ओळख देणारी माहिती छापणे किंवा प्रसिद्ध करणे. (२२८ अ) २ वर्षे सजा किंवा दंड
•  महिलेकडे पाहून सार्वजनिक ठिकाणी असभ्य किंवा अश्लील हातवारे करणे/गाणी म्हणणे (२९४) ३ महिन्याची  सजा किंवा दंड
•  हुंडा मागणे (हुंडा कायदा १९६१) ५ वर्षांची सजा, १५०००/- दंड
•  खून (३०२) जन्मठेप /फाशी
•  हुंडाबळी (३०४ ब) जन्मठेप
•  महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात (३१३) जन्मठेप किंवा १० वर्षे सजा व दंड
•  महिलेच्या संमतीशिवाय केलेल्या गर्भपाताच्या वेळी महिलेचा मृत्यू (३१४) ७ वर्षे सजा किंवा जन्मठेप
•  पत्नीला मारहाण, सामान्य जखमा (३२३) ५ वर्षे सजा,१०,०००/- पर्यंत दंड, दोन्हीही
•  पत्नीला मारहाण, गंभीर जखमा (३२५) ७ वर्षे सजा, दंड
•  अवैधरित्या ताब्यात बंद करुन ठेवणे (अडथळा निर्माण करणे) (३४०) 1 महिना सजा, रु. १०००/- दंड किंवा दोन्हीही
•  अवैधरित्या डांबून ठेवणे (३४२) १ वर्षे सजा, रु. १०००/- दंड किंवा दोन्हीही
•  हल्ला करणे किंवा गुन्हेगारी ताकदीचा उपयोग करुन महिलेचा विनयभंग करणे (३५४) २ वर्षे सजा व दंड किंवा दोन्हीही
•  अपहरण किंवा पळवून नेणे (३६३)  ७ वर्षे सजा आणि दंड
•  अल्पवयीन मुलांना भिक्षेसाठी अपंग बनवणे (३६३ अ) जन्मठेप / १० वर्षे सजा
•  अल्पवयीन मुलीचे अपहरण (३६४) १० वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  खून करण्यासाठी अपहरण करणे किंवा पळवून नेणे (३६४) १० वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  विवाहासाठी सक्तीने महिलेला पळवून नेणे, अपहरण करणे, जबरदस्ती करणे (३६६) १० वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  अल्पवयीन मुलींना विवाहासाठी पळवणे (३६६ अ) १० वर्षे सजा आणि दंड
•  परदेशातून मुली पळवून आणणे (३६६ ब) १० वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  अल्पवयीन मुलींना त्यांच्याजवळील वस्तूंची चोरी करण्यासाठी पळविणे (३६९) ७ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  एखाद्या मुलीला किंवा महिलेला गुलाम बनिवण्यासाठी विकत घेणे किंवा तिची विल्हेवाट लावणे (३७०) ७ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी विकणे (३७२) १० वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  अल्पवयीन मुलगी वेश्या व्यवसायासाठी विकत घेणे (३७३) १० वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  बलात्कार (३७६)  ७ वर्षे ते १० वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  कायद्याने वेगळे राहणा-या पत्नीबरोबर संभोग/जबरदस्ती (३७६ अ) २ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  अधिकाराखालील पब्लिक सर्वंटबरोबर संभोग/जबरदस्ती (कस्टडी रेप) (३७६ ब) ५ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  तुरूंग अधिकारी किंवा रिमांड होमच्या अधिकाऱ्याने अधिकाराखालील महिलेशी केलेली जबरदस्ती (३७६ क) ५ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  एखाद्या रूग्णालयातील व्यवस्थापन सदस्याने रूग्णालयातील महिलेशी केलेला संभोग/जबरदस्ती (३७६ ड) ५ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  कायदेशीर विवाह आहे असे भासवून एखाद्या महिलेला फसवून तिच्यासोबत (फसवून) राहणे (४९३) १० वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  अवैधरित्या दुसरी पत्नी करणे (४९४) ७ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  पहिले लग्न लपवून दुसरा विवाह करणे – द्विभार्या प्रतिबंधक कलम (४९५) १० वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  कायदेशीर विवाह नसताना विवाहाचा समारंभ घडविणे (४९६) ७ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  व्यभिचार (४९७) ५ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  विवाहित स्त्रीला गुन्हेगारी वृत्तीने अटकाव करणे, घेऊन जाणे (४९८) २ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  नवविवाहितेचा हुंड्यासाठी किंवा इतर कारणाने शारीरिक किंवा मानसिक छळ (४९८ अ) ३ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही
•  एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, शब्द उच्चारणे/कृती करणे (५०९) १ वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही                   *संकलन श्री.सोमनाथपाटील कामेरी ता.वाळवा जि.सांगली   FEMINIST WOMEN IN MAHRASHTRA 1975-2010

Comments

  1. फक्त महिलांसाठीच का आहेत हे नियम पुरुषांसाठी का नाहीत? जर एखाद्या महिलेने अशे कृत्य एखाद्या पुरुषा सोबत केले तर महिलेला का नाही अशी शिक्षा? स्त्री पुरुष समान आहेत ना तर मग असा भेदभाव का ? निरपराधीत पुरुषांचा बळी घेतला जातो काही वेळेस

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गोञ व कुळ यादी

गणितातील एकके

भारतीय समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक संस्था,कार्य,कायदे